नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला शनिवारी प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणारी ती दुसरी टेनिसपटू ठरली. जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थान मिळविल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सानियाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता.
क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारासाठी सानियाचे नाव निश्चित केले. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाला नोटीस पाठवत या निर्णयाला स्थगिती दिली होती.
पॅरालिंपियन एच. एन. गिरीशा याने क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. लंडन २०१२ पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या गिरीशा याने आपणच या पुरस्कारासाठी लायक असल्याचे सांगून न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.
यापूर्वी लिअँडर पेसला १९९६ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.