दिल्लीतील या रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कमाल यांचे नाव एका मार्गाला देण्यात आले आहे.

PTI | Updated: Aug 28, 2015, 10:16 PM IST
दिल्लीतील या रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव title=

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कमाल यांचे नाव एका मार्गाला देण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील औरंगजेब रोडचं नाव बदलण्यात आले असून एपीजे अब्दुल कलाम रोड असं नामकरण करण्यात आले आहे. दिल्ली महानगरपालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

औरंगजेब रोडचं आता दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असं नामकरण करण्यात आलंय. नवी दिल्ली महापालिकेनं या नामांतराचा निर्णय घेतलाय. या नामांतरामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कलाम यांच्या निधनानंतर या रस्त्याला त्यांचं नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.