10
10
अफगाणिस्तानमधील हेरात इथं झालेल्या गॅस टर्मिनलच्या स्फोटात 10 मुलांचा आणि एका प्रौढ व्यक्तिचा मृत्यू झालाय. तर 18 नागरिक जखमी झाले आहेत. लढाईमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांसाठी कॅम्प असलेल्या जागेजवळ हा स्फोट झाला असून हा अपघात आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महिला कर्मचाऱ्यांना 8 महिने बाळंतपणाची रजा द्यायला हवी अशी मागणी, केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केली आहे.
इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा केलेल्या कुमार संगकारासमोर श्रीलंका सरकारनं ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांने हा प्रस्ताव स्वीकारला तर त्याची दुसरी इनिंग सुरु होईल.
जाळपोळ आणि हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.
जागतिक मंदीमुळे सराफा बाजारात मंदी दिसत आहे. सोने बाजारात या घडामोडीचे पडसाद उमटले आहेत. दिल्लीत १८६ रुपयांनी सोने दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. सोने प्रति १० ग्रॅम (तोळे) २७,२६२ रुपये इतके होते.
श्रीलंकेविरोधात टीम इंडियाने २७८ रन्सने विजय संपादनकेला. टीम इंडियाल जवळपासू एक वर्षापासून कसोटीमध्ये विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत.
ताजमहलच्या रॉयल गेटवर असलेलं 107 वर्ष जुना ब्रासचा लँप बुधवारी संध्याकाळी पडला. ताजमहल रिकामा करण्याच्या वेळी घडलेल्या या घटनेतून पर्यटक थोडक्यात बचावले. हा लँप 1908मध्ये लॉर्ड कर्झननं भेट म्हणून दिला होता.
वन रँक, वन पेन्शन योजनेसाठी माजी स्वातंत्र्य सैनिक आक्रमक झालेत. जंतरमंतर स्वातंत्र्य सैनिकांचं आंदोलन सुरु असून या आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आंदोलनाला केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या लेकीचाही पाठिंबा मिळालाय.
आसाममध्ये पुराचा हाहाकार कायम आहे.. १९ जिल्ह्यांना पूराचा फटका बसलाय. पूरात आतापर्यंत८ जणांचा बळी गेलाय. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय.
पाकिस्तान भारताशी सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला कोणत्याही अटी मान्य नाहीत. अटींशिवाय चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु भारताला चर्चा करायची नाही, असा उलटा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी पत्रकार परिषदेत केला.