अहमदाबाद : गुजरातमध्ये लष्करानं ध्वजसंचलन केल्यावर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पाटीदार समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी गुजरातमध्ये उभ्या राहिलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. बुधवारी सकाळपासून उसळलेल्या हिंसेत नऊ जणांचा बळी गेलाय. त्यानंतर राज्य सरकारनं लष्कर पाचारण केलं.
अधिक वाचा : पटेल आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ ठार
सूरत, राजकोट आणि मेहसाणामध्ये लष्कराच्या प्रत्येकी दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरतमध्ये सकाळी काही भागात स्वतःहून बंद पाळण्यात येतोय. तर काही भागातील जनजीवन पूर्वपदावर येतंय. अहमदाबादतमध्ये शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.
अधिक वाचा : हार्दिक पटेल दुसरे अरविंद केजरीवाल?
दरम्यान बुधवारी रात्री उशिरा अहमदाबादचे पोलीस आयुक्त शिवानंद झा यांनी शहराच्या नऊ भागांमध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू केली. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार तिकडे सुरतमध्ये एक हजार जणांच्या एका जमावानं बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. त्यावेळी झालेल्या दगडफेक आणि हिंसाचारात पोलीस उपनिरीक्षक मितेश साळुंखे गंभीर जखमी झालेत. त्यानंतर सूरतमध्ये राज्य राखीव दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.