कोलंबो : टीम इंडियाच्या दोन्ही शर्मांनी चांगली कामगिरी केल्याने 22 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने केला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 117 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
अधिक वाचा : ईशांत शर्माची सटकली, श्रीलंका खेळाडूंशी भिडला
काल टीम इंडियाने तीन विकेट घेत, चांगली सुरुवात केली. आज खेळ सुरु झाला तेव्हा भारताला विजयासाठी सात विकेट घेण्याचे आव्हान होते. हे आव्हान समर्थपणे पेलत टीम इंडियाच्या बॉलरने विजय खेचून आणला. श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचे झुंजार नाबाद शतक (110 रन्स) आणि कुशल परेराच्या 70 रन्सच्या खेळीमुळे भारतीय संघाने श्रीलंकेत ऐतिहासिक विजय मिळविला आहे.
अधिक वाचा : एबी डिव्हिलर्सने मोडला गांगुलीचा विक्रम
आज कसोटी अखेरच्या दिवशी श्रीलंकेने तीन 67 वरून पुढे खेळताना नाबाद असलेल्या कौशल सिल्वाला सुरुवातीलाच गमावले. उमेश यादवच्या गोलंदाजीवर पुजाराने त्याचा झेल टिपला. कर्णधार मॅथ्यूजने एका बाजूने फलंदाजी करत थिरीमन्नेच्या साथीने डाव सावरला. अखेर अश्विनने थिरीमन्नेची विकेट काढून विजय अधिक सोपा केला. थिरीमन्नेला के. राहुलने सुरेख कॅच घेतली. मात्र त्यानंतर भारतीय बॉलरच्या चांगल्या कामगिरीमुळे सात विकेट मिळवत विजय मिळविला.
पाहा स्कोअरकार्ड :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.