नवी दिल्ली : जम्मूतील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जामाऱ्यांना जजिया कर द्यावा लागणार आहे, अशी टीका काँग्रेसने केलेय.
जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारने वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांवर मुघल साम्राज्याप्रमाणे जजिया कर लावला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी यांच्या युतीचे सरकार आहे. या सरकारने हेलिकॉप्टरने वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांसाठी १२.५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. हा कर जजिया कर आहे. हा कर राज्य सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केलेय.
माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्यने भक्त पायी, घोडे, खेचर यांच्यावर जातात. तर काहीजण पायी जाऊ शकत नाही. ते पालखी किंवा हेलिकॉप्टरची मदत ज्येष्ठ लोक घेतात. या लोकांबरोबर राज्य सरकारने चेष्टा केली आहे, अशी टीका सिंघवी यांनी केलेय.
दोन सप्टेंबरपासून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता साडेबारा करामुळे १०३९ रुपयांचे भाडे ११७० रुपये झालेय, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.