अमेरिकन ओपन : राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात

माजी वर्ल्ड नंबर वन राफाएल नदालचे अमेरिकन ओपनमधील आव्हान धक्कादायकरित्या दुसऱ्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं. 

PTI | Updated: Sep 5, 2015, 06:51 PM IST
अमेरिकन ओपन : राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात title=

वॉशिंग्टन : माजी वर्ल्ड नंबर वन राफाएल नदालचे अमेरिकन ओपनमधील आव्हान धक्कादायकरित्या दुसऱ्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं. 

इटलीच्या २२व्या सीडेड फाबियो फॉगनिनीनं त्याच्यावर पाच सेटमध्ये मध्ये मात केली. नदालला ३-६, ४-६, ६-४, ६-३, ६-४ अशा सेटमध्ये पराभव सहन करावा लागला. कुठल्याही ग्रँडस्लॅममध्ये दोन सेटमधअये आघाडी घएऊनही पराभूत होण्याची नदालची ही पहिलीच वेळ आहे.

आठव्या सीडेड नदालची १० वर्षांत टेनिस सीझनमध्ये एकही ग्रँडस्लॅम न जिंकण्याचीही ही पहिलीच वेळ ठरली आहे. ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपनमध्ये त्याचं आव्हान संपुष्टात आलं होतं. तर विम्बल्डनमध्ये त्याला अमेरिकन ओपनप्रमाणे सेकंड राऊंडमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.