अवघ्या ४५ हजारांसाठी १ वर्षाच्या मुलाला पित्यानंच विकलं

सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. इथं एका व्यक्तीनं आपल्या एक वर्षाच्या मुलाला अवघ्या ४५ हजारांमध्ये विकल्याचं कळतंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. 

PTI | Updated: Sep 7, 2015, 02:22 PM IST
अवघ्या ४५ हजारांसाठी १ वर्षाच्या मुलाला पित्यानंच विकलं title=

सहारनपूर, उत्तर प्रदेश: सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. इथं एका व्यक्तीनं आपल्या एक वर्षाच्या मुलाला अवघ्या ४५ हजारांमध्ये विकल्याचं कळतंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. 

आणखी वाचा - व्हिडिओ: जेव्हा चिमुरड्याचं डोकं प्रेशर कुकरमध्ये अडकलं!

गगलहेडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश शर्मा यांनी सांगितलं की, मुलाच्या आईनं तक्रार केलीय. तिच्या पतीनं एका आशा नर्ससोबत ४५ हजार रुपयांमध्ये हरियाणातील एका जोडप्याला विकलं.

पोलिसांचं म्हणणं आहे की, प्रकरणात गुन्हा नोंदवला गेलाय आणि घटनेचा तपास सुरू आहे. 

आणखी वाचा - लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.