नवी दिल्ली : एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास करणं आता शक्य होणार आहे. कारण विविध मेट्रो आणि अन्य वाहतूक व्यवस्थांमार्फत प्रवास करता येईल, असं नवीन स्मार्ट कार्ड नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
अधिक वाचा : इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ
नागरी विकास मंत्रालय हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सादर करणार आहे. देशांतर्गत काम करु शकेल, अशा सिस्टमला नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंजुरी दिलीय.
या कार्डच्या माध्यमातून देशात कुठेही प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय रिटेल खरेदीसाठीही या कार्डचा उपयोग करता येणार आहे. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डप्रमाणे या नवीन स्मार्ट कार्डचा वापर करता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.