राम मंदिर उभारण्यास जगातील कोणतीही ताकत रोखू शकत : साक्षी

जगाच्या नकाशावरील पाकिस्तान अस्तित्वात राहणार नाही. भारत हा काश्मीरचा गुलाम नाही तर आता लोहोरची मागणी करेल. पाकिस्तान अधिकृत काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंक आहे आणि भारत याच्यासह राहिल, असे बेधडक विधान खासदार सच्चिदानंद हरी साक्षी यांनी केलेय. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत कोणीही रोखू शकत नाही, असे ते यावेळी म्हणालेत.

PTI | Updated: Sep 10, 2015, 11:33 AM IST
राम मंदिर उभारण्यास जगातील कोणतीही ताकत रोखू शकत : साक्षी title=

नवी दिल्ली : जगाच्या नकाशावरील पाकिस्तान अस्तित्वात राहणार नाही. भारत हा काश्मीरचा गुलाम नाही तर आता लोहोरची मागणी करेल. पाकिस्तान अधिकृत काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंक आहे आणि भारत याच्यासह राहिल, असे बेधडक विधान खासदार सच्चिदानंद हरी साक्षी यांनी केलेय. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत कोणीही रोखू शकत नाही, असे ते यावेळी म्हणालेत.

साक्षी यांनी दावा केलाय, बिहार आणि उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजप दोन तृतियांश बहुमत मिळवून सत्तेत येईल. समाजवादीच्या विधानामुळे पार्टी निराश असल्याचे दिसून येत आहे.

भारताला माहित आहे की, पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाक भारतात दहशतवाद्यांच्यामार्फत घुसखोरी करीत आहे. पंतप्रधान सहनशील आणि आध्यात्मवादी आहेत. मात्र, पाकिस्तानला उत्तर देण्याची वेळ जवळ आली आहे, असे ते म्हणालेत.

प्रभू श्रीराम कोटी कोटी हिंदुस्थानी लोकांचे आराध्य आहे. जगातील कोणतीही ताकत अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत रोखू शकत नाही. याबाबत मुस्लीमांनी मोठ्या दिल्याने आपली ओळख करून दिली पाहिजे. पहिल्यांदाच देशाला असा प्रधानमंत्री लाभला आहे की, भारताची शान जगात उंचावली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.