लाहोर : पाकिस्तानील पेशावर येथील हवाई लष्कराच्या विमानतळावर आज सकाळी १० अतिरेक्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याताला प्रत्युत्तर देताना लष्कराने ६ दहशतवादी ठार केले. तर ४ जण अजूनही गोळीबार करत आहेत.
दहशतवाद्यांनी पेशावरमधल्या पाकिस्तानी विमान दलाच्या तळावर सशस्त्र हल्ला चढवला. अद्याप लष्कर आणि दहशतवादी यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे. आत्तापर्यंत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे पाकिस्तानी लष्करी अधिका-यांनी सांगितले.
गेल्या काही हल्ल्यांपैकी हा सर्वात मोठा हल्ला मानण्यात येत आहे. मेजर असीम बाजवा यांनी हदशतवाद्यांना हवाई दलाच्या बाहेरच्या बाजूसच रोखण्यात यश आल्याचे ट्विट केलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.