नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज कोलकातामध्ये सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी यांच्याबाबतच्या 64 फाईल्स कोलकाता पोलीस म्यूझियममध्ये जनतेसाठी खुल्या केल्या आहेत.  

PTI | Updated: Sep 18, 2015, 01:16 PM IST
नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक title=

कोलकाता: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज कोलकातामध्ये सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी यांच्याबाबतच्या 64 फाईल्स कोलकाता पोलीस म्यूझियममध्ये जनतेसाठी खुल्या केल्या आहेत. याचं डिजिटल रुप नेताजींच्या कुटुंबियांना सोपवण्यात आलंय. त्यामुळं आता नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडण्याची शक्यता निर्माण झालीय.

अनेक वर्षांपासून या फाईल्स सरकार आणि पोलिसांच्या लॉकरमध्ये बंद होत्या, त्या आता सार्वजनिक झाल्या आहेत. याबाबत नेताजींचे नातू चंद्रा बोस यांनी सांगितलं की, "हे पाऊल उचलल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन. स्वतंत्र भारतात नेताजींच्या कुटुंबियांची हेरगिरी केली जाते, ही लाजिरवानी बाब आहे. या फाईल्स सार्वजनिक झाल्यानं अनेक सत्य पुढे येतील, अशी आशा आहे. आमच्या कुटुंबाची हेरगिरी का करण्यात आली, याची चौकशी करण्याची मोदी सरकारला विनंती करतो."

आणखी वाचा - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जिवंत होते सुभाष चंद्र बोस?

फाईल्सची डिजिटल कॉपी कोलकाता पोलीस कमिश्नर सुरजीत पुरकायस्थ यांनी नेताजींच्या कुटुंबियांना सोपवली आणि फाईल्स पोलीस म्यूझियमध्ये ठेवल्यात. ते म्हणाले, या 64 फाईल्समध्ये 12744 पानं आहेत. सर्व पानं डिजिटलाइज्ड केले गेलेत.  

या फाईल्स सार्वजनिक होताच अनेक वर्षांपासून नेताजींच्या मृत्यूबाबत असलेलं गूढ उलगडण्याची शक्यता आहे. सोबत अशा अनेक सूचना ज्या दिल्लीच्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या गुप्त सूचीमधून आधीच काढून टाकण्यात आल्या होत्या, त्या सुद्धा आता देशाला कळतील.

1997च्या रिपोर्टमधून अशी एक फाईल पुढे आली, ज्यानुसार 18 ऑगस्ट 1945मध्ये तायहोकूच्या विमान अपघातात बोस यांचा मृत्यू झाल्यानंतर महात्मा गांधींनी सार्वजनिक सांगितलं होतं, की मला वाटतं नेताजी जिवंत आहेत. बंगालमध्ये एका प्रार्थना सभेत महात्मा गांधींनी केलेल्या या वक्तव्याच्या चार महिन्यांनंतर एक लेख छापून आला होता, त्यात त्यांनी अशा निराधार भावनेवर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही, असं म्हटलं होतं.

आणखी वाचा - सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ कायम 

तर 1946च्या गुप्त फाईलनुसार गांधीजींनी आपल्या या भावनेला अंतर्मनाचा आवाज म्हटलं होतं. पण तत्कालिन काँग्रेस नेत्यांना वाटत होतं की गांधीजींना काही गुप्त माहिती आहे. फाईलमध्ये लिहिलं गेलं होतं की एका गुप्त रिपोर्टमध्ये नेहरूंना बोस यांनी लिहिलेलं एक पत्र सापडलं. त्यात होतं नेताजी रशियामध्ये आहेत आणि त्यांना भारतात परतायचंय. 

गांधीजींनी जेव्हा म्हटलं नेताजी जिवंत आहेत, तेव्हाच कदाचित हे पत्र पाठवण्यात आलं असेल. नेताजींच्या कुटुंबातील चंद्र बोस यांचं म्हणणं आहे की, महात्मा गांधींना नक्की माहिती होतं नेताजी कुठे आहेत. त्यांनी म्हटलं होतं, मला वाटतं नेताजींचं श्राद्ध करू नये कारण त्यांच्या मृत्यूवर अजून प्रश्नचिन्ह आहे. 
 

आणखी वाचा - नेताजींसंबंधित कागदपत्रं खुली करावीत? समिती नेमली

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.