पोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद

पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.

PTI | Updated: Sep 23, 2015, 04:30 PM IST
पोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद title=
सौजन्य- मेजर ध्रुव यांचं फेसबुक अकाऊंट (फाईल फोटो)

पोखरण,राजस्थान: पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात आणखी काही जवान जखमी झाले आहेत. देशातील सर्वात मोठी पोखरण फायरिंग रेंजमध्ये सैन्याच्या विविध तुकड्या आपला युद्धाभ्यास करत असतात. सध्या फायरिंग रेंजमध्ये भारतीय सैन्याच्या ७५ आर्म्डचा युद्धाभ्यास सुरू आहे. याच सरावादरम्यान, टँकमधून निघालेला बॉम्ब लक्ष्यावर पोहोचण्याआधी तिथंच फुटला.

या बॉम्बचं लक्ष्य ठरलेले मेजर ध्रुव यादव यांचा जागीच मृत्यू झाला. जोधपूरमध्ये सेनेचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष ओझा यांनी घटनेवर शिक्कामोर्तब करत सांगितलं की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मेजर ध्रुव हरियाणा इथले राहणारे होते आणि त्यांचं वय ३२ वर्ष होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.