शिर्डी: श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने (एसएसएसटी) आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर आणि जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवी मंदिराच्या धर्तीवर आता 'वेळ दर्शन' सेवा सुरू करण्याचा विचार केलाय. या सेवेद्वारे आपण दर्शनाची वेळ बुक करून त्यावेळेत साईबाबांचं दर्शन घेऊ शकाल.
एसएसएसटीचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सांगितलं की, कुंभमेळा संपल्यानंतर ट्रस्टचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम 'वेळेत दर्शन' याबाबत अभ्यास करेल. त्यानंतर एक रिपोर्ट तयार केली जाईल आणि ट्रस्टच्या तीन सदस्यीय समितीकडे सोपवली जाईल. मग ही पद्धत कशी लागू करता येईल याबाबत निर्णय होईल.
आणखी वाचा - व्हिडिओ : जात प्रमाणपत्र मिळवायचंय... शिव्या खा!
'वेळेत दर्शन' या योजनेअंतर्गत भाविकांना एक विशेष वेळ देण्यात येईल. जेव्हा ते बाबांच्या दर्शनासाठी जावू शकतात. आगंतुक भाविक या टाइम स्लॉटचा फायदा घेऊ शकतात. यादरम्यान ट्रस्टनं मंदिराला सुरक्षा पुरविण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला एक प्रस्ताव पाठवलाय. सध्या मंदिराची सुरक्षा त्यांचे मंदिराचे सुरक्षा रक्षक करतात आणि अहमदनगर ग्रामिण पोलीसांचे जवान पण मंदिराची सुरक्षा करतात. परदेशी नागरिकांसह हजारो भाविक दररोज साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येतात.
आणखी वाचा - सीसीटीव्ही: चोरट्यांनी केली चंदनाची चोरी, कालिका मंदिरातील प्रकार
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.