हैदराबाद : केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खूपच संतापलेत. त्यांनी या विधानावर आक्षेप घेतला. अशा मंत्र्यांना मोदींनी लाथ मारुन बाहेर काढले पाहिजे, असे म्हटले.
एपीजे अब्दुल कमाल यांच्याबाबत हे वादग्रस्त विधान महेश शर्मा यांनी केले. त्यांनी म्हटले की, कलाम हे मुस्लिम असूनही महान देशभक्त होते. या विधानामुळे महेश शर्मा यांनी १७ कोटी मुस्लिमांच्या देशभक्तीवर संखा घेतली गेलेय, असे ओवेसी यांनी म्हटलेय.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६९ वर्षानंतर असे म्हणणे हे हास्यास्पद आहे. मुस्लिमांच्या राष्ट्रप्रेमावर संखा उपस्थित करण्यात येत आहे. हे धक्कादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे करु देत आहेत. शर्मानी म्हटलेय, कलाम हे मुस्लिम असूनही राष्ट्रप्रेमी आणि मानवतावादी होते. त्यांनी साध्या भाषेत आपले म्हणणे मांडलेय. याचा अर्थ असा होतो, मुस्लिमांवर विश्वास ठेवला जात नाही.
याप्रकणी मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. १७ कोटी मुस्लिमांबाबत त्यांचा काय विचार आहे. मोदीही शंका उपस्थित करीत आहेत का, असे ओवेसी यांनी म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.