बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान

बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. दुपारी ४ पर्यंत ५६ टक्के मतदारांनी हक्क बजावला. अखेरच्या तासात वेग वाढण्याची शक्यता होती.

PTI | Updated: Nov 5, 2015, 05:24 PM IST
बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान title=

पाटणा : बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. दुपारी ४ पर्यंत ५६ टक्के मतदारांनी हक्क बजावला. अखेरच्या तासात वेग वाढण्याची शक्यता होती.

बिहारमध्ये आज अखेरच्या टप्प्यात मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. दुपारी ४ वाजेपर्यंत ५५.९०टक्के मतदानाची नोंद झालीय. एकूण ९ जिल्ह्यातल्या ५७ जागांवर ही मतदान प्रक्रिया सुरू आहे. मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, मधेपुरा, सहरसा आणि दरभंगा या जिल्ह्यात हे मतदान सुरु आहे.

५५ जागांसाठी संध्याकाळी पाच पर्यंत तर नक्षलप्रभावित २ जागांसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

आजच्या मतदानानंतर सा-यांना वेध लागणार आहेत ते निकालाचे. ८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून बिहारमध्ये कुणाचं सरकार येणार याचा फैसला होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.