नवी दिल्ली : देशात असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने असहिष्णूता पसरवण्यात येत आहे. यातून समाजा समाजामध्ये फूट पाडण्यात येतेत, असा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे.
देशात वाढत जाणार्या असहिष्णूतेचा निषेध करत दिल्लीमध्ये काँग्रेसने मोर्चा काढला. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना याबाबत निवेदन दिले. भाजप सरकारमधील व त्यांच्या विचारसरणीशी संबंधित लोक समाजामध्ये फूट पाडणारी विखारी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्याविरोधात पंतप्रधान मोदी काहीही बोलत नाहीत, यावरून अशा घटनांना पंतप्रधानांची सहमती आहे, असाच अर्थ निघतो, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.
तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी भाजप आणि संघावर गंभीर आरोप केलाय. संघाचे लोक देशभरामध्ये समाजा समाजात फूट पाडत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री यांना वाढती असहिष्णूता दिसत नसेल तर त्यांनी देशातल्या गावागावामध्ये जाऊन परिस्थिती पाहावी, असा टोला हाणला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.