छोटा राजन बाली विमानतळावर, भारतात आज रात्री

डॉन छोटा राजनला भारतात आणण्यासाठी बाली विमानतळावर आणले आहे. आज रात्रीपर्यंत भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. ज्वालामुखीमुळे खंडित झालेली विमानसेवा सुरळीत झालेय. दरम्यान, राजनला भारतीय इंटरपोलच्या हवाली केले जाणार आहे.

PTI | Updated: Nov 5, 2015, 06:59 PM IST
छोटा राजन बाली विमानतळावर, भारतात आज रात्री title=

बाली : डॉन छोटा राजनला भारतात आणण्यासाठी बाली विमानतळावर आणले आहे. आज रात्रीपर्यंत भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. ज्वालामुखीमुळे खंडित झालेली विमानसेवा सुरळीत झालेय. दरम्यान, राजनला भारतीय इंटरपोलच्या हवाली केले जाणार आहे.

इंडोनेशिया पोलिसांच्या कोठडीत असलेला डॉन छोटा राजनला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छोटा राजनला इंडोनेशियाच्या विमानतळावर आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. आज रात्रीपर्यंत त्याला भारतात आणले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

छोटा राजनला भारतात आणण्याच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून इंटरपोलनेही त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिलेय. त्याला बुधवारीच भारतात आणले जाणार होते पण ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाली येथील विमानतळ बंद झाल्याने राजनच्या प्रत्यार्पण लांबवणीवर पडले.

राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे असून तो अनेक गुन्ह्य़ात भारताला हवा आहे. इंडोनेशियाशी प्रत्यावर्तन करार नसल्याने भारतीय अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून राजनचा ताबा मागितला आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.