चेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट

पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय. 

PTI | Updated: Nov 9, 2015, 01:05 PM IST
चेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट title=

चेन्नई: पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय. 

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार चेन्नईपासून जवळपास ४५० किलोमीटर दक्षिण-पूर्वमध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळं चक्रीवादळ सोमवारी रात्रीपर्यंत चेन्नई आणि कराईकल दरम्यान तामिळनाडू तटापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 

पुढील २४ ते ४८ तास आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.