स्पाइसजेटनं 599 आणि 1999 रुपयांमध्ये करा विमान प्रवास

आता स्पाइसजेटनंही इतर विमान कंपन्यांसोबत स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आपल्या दोन स्लॅबमध्ये दिलेल्या स्वस्त विमान प्रवासाची योजनेची तारीख स्पाइरजेटनं वाढवून दिलीय. 

PTI | Updated: Sep 7, 2014, 10:13 AM IST
स्पाइसजेटनं 599 आणि 1999 रुपयांमध्ये करा विमान प्रवास   title=

नवी दिल्ली: आता स्पाइसजेटनंही इतर विमान कंपन्यांसोबत स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आपल्या दोन स्लॅबमध्ये दिलेल्या स्वस्त विमान प्रवासाची योजनेची तारीख स्पाइरजेटनं वाढवून दिलीय. 

स्पाइसजेटमधून पुढील वर्षी 16 जानेवारी ते 24 ऑक्टोबर दरम्यान प्रवास करणारे व्यक्ती आता 10 सप्टेंबरपर्यंत आपलं विमानाचं तिकीट बुक करू शकतील. या तारखेदरम्यान प्रवास करणाऱ्य़ांना 599 रुपयात प्रवासाची ऑफर आहे. तर याच वर्षी 7 ऑक्टोबर ते 15 जानेवारी 2015 प्रवास करणाऱ्यांसाठी 1,999 रुपये तिकीटाची ऑफर देण्यात आलीय. कंपनीनं 599 रुपयाच्या तिकीटामध्ये इंधन कर जोडलेला नाहीय. मात्र 1,999 रुपयांच्या तिकीटात सर्व शुल्क जोडले गेलेत. 

एअरलाईन्सचे सीईओ संजीव कपूर यांनी सांगितलं की, ‘यावर्षी बाजारात असलेली तेजी आणि वाढलेली मागणी, यात स्पाइसजेट सर्वात अग्रेसर आहे. एअरलाइन्स कंपन्यांना राजाश्रय मिळातो, त्यामुळं प्रवाशांना स्वस्त प्रवासाचा लाभ मिळतो. यासर्वांमुळं परिवहन उद्योग आणि अर्थव्यवस्थेला फायदा होतोय.’

एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो आणि गो एअरनंही नुकतीच अशी योजना सुरू केली. एवढंच नव्हे तर एअर कोस्टा आणि एअरएशिया सारख्या नव्या एअरलाइन्स कंपन्या सुद्धा स्पर्धेत उतरल्या आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.