न्यू यॉर्क : सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकचे बाजार मूल्य २०० अब्ज डॉलरपर्यंत येऊन पोहचले असून यानंतर फेसबूक हे संपूर्ण जगातील २२वी सर्वात मोठी कंपनी झाली आहे. कंपनी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा २००.२६ अब्ज डॉलरपर्यंतचा उच्चांक कंपनीने गाठला आहे. सोमवारी कंपनीचे शेअर ७७.६ डॉलरपर्यंत झाल्याचे मीडिया रिपोर्टद्वारे सांगण्यात आले आहे.
फोटो शेअर करणारी वेबसाइट इंस्टाग्राम आणि मॅसेजिंग सेवा म्हणजे व्हाट्स अॅप हे कायदेशीरित्या त्यांना विकत घेण्यासाठी फेसबूक प्रयत्नशील आहे. त्यामुळे फेसबुकचे पुढील भविष्य हे उज्ज्वल असल्याचे या रिपोर्टवरून दिसत आहे.
आफ्रिकेमध्ये फेसबूक वापरणाऱ्याची संख्या ही १० कोटीपर्यंत येऊन पोहचली आहे. अशी घोषणा देखील कंपनीने यावेळी केली.
संपूर्ण जगामधील मोठ्या कंपनीच्या यादीत फेसबुकचे नाव हे टोयोटा मोटर कॉर्पोरेशनच्या फक्त एक पाऊल पुढे तर वेरिझोन कम्युनिकेशनपासून एक पाऊल मागे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.