लंडन : अॅपल कंपनीचा खूप दिवसापासून प्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन
आयफोन 6 हा १७ ऑक्टोबरला भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.
अमेरिकेत हा आयफोन १९ सप्टेंबरपासून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होईल.
११७ देशामध्ये या नवीन आयफोन 6 लॉन्च करण्याचा कंपनी विचार करत
आहे.
कंपनीकडून सांगण्यात येते की, आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस हे
स्मार्टफोन १७ ऑक्टोबरपासून भारतात त्याची विक्री देखील सुरू होईल. अॅपल
कंपनीनं हा आयफोन लॉन्च करण्यासाठी भारताला प्रथम प्राधान्य दिलं आहे.
अनेक देशात पहिल्यांदा अॅपल कंपनीचं फोन प्रदर्शित करण्याचा प्रयत्न
असणार आहे. यासाठी अनेक देश उत्सुकतेने आयफोन यांची वाट बघत आहे.
हा आयफोन भारताच्या एअरटेल, एअरसेल अन्य कंपनीच्या रिटेल स्टोर्समध्ये
उपलब्ध होईल. यासाठी कंपनीनं जय्यत तयारी सुरू केली आहे. या फोनला
मोठ्या दिमाखात लॉन्च करण्याची कंपनीची इच्छा आहे. काही काळापासून
भारताच्या मोबाईल बाजारपेठेवर पकड मजबूत करण्यासाठी अॅपल कंपनी
प्रयत्नशील आहे.
आयफोन 6 ची स्क्रीन ४.७ इंच असून आयफोन प्लस ची ५.५ इंच आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या मॉडलपेक्षा याचा कॅमरा आणि व्हिडीओ
क्वालिटी चांगली आहे.
भारतात हा आयफोन कोणत्या किंमतीला बाजारात उपलब्ध होईल, याची
घोषणा कंपनीने अजूनपर्यंत केली नाही. ५०,००० रुपयांपर्यंत हा आयफोन
बाजारात असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमेरिकेत कॉन्ट्रॅक्टचा १६ जीबीचा आयफोन 6 हा १९९ डॉलरमध्ये मिळतो.
जशी फोनची इंटरनल मेमरी वाढेल तशी किंमतही वाढणार आहे. त्यामुळे
१२८ जीबीचा फोन ४९९ डॉलरला मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.