मोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. 

PTI | Updated: Sep 9, 2014, 12:39 PM IST
मोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. 

पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. या बैठकीत आर्थिक प्रश्नांबरोबरच दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यावरही चर्चा होणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये मोदी यांचं स्वागत करण्यासाठी बराक ओबामा उत्सुक असल्याचं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी स्पष्ट केलयं.  

आर्थिक विकासाबरोबरच वाढता दहशतवाद, अफगाणिस्तान, सिरिया आणि इराक मधील परिस्थितीबद्दलची दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. 
  
भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांची भेट भारताला एका नव्या उंचवीर नेईल अशी प्रतिक्रिया दिलीय. तर सरकारकडे या भेटीमधील चर्चेसाठी ठोस मुद्दे आहेत का?असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.