10
10
रशियाचे एक मासेमारी करणारे जहाज समुद्रात बुडाले. यामध्ये ५४ जणांना जलसमाधी मिळाली. या जहाजावर १३२ लोक होते.
काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यात एक पोलीस आणि एक जवान शहीद झालाय. तर एक नागरिकही जखमी झालाय.
येमेनच्या युद्धभूमितून २५८ भारतीय नागरीक सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यातील १६८ नागरीक कोचीला आणि १९० नागरीक मुंबई विमानतळावर आज पहाटे पोहोचले.
अर्थसंकल्प २०१५-१६मध्ये घोषित केला गेलेल्या सर्व्हिस टॅक्स बदलानंतर आता प्राणीसंग्रहालय, अभयारण्यांमधील प्रवेश तिकीट स्वस्त होणार आहेत. तर बिझनेस क्लासमध्ये विमान प्रवास, म्युचुअल फंड आणि चिटफंडमधील गुंतवणूक महागणार आहे.
बऱ्याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मॅसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरं झालं असतं, किंवा एखाद्या ठराविक व्यक्तीला तरी निदान तो मॅसेस पाठवायला नको होता, अशी पश्चातबुद्धी आपल्याला होते.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं.
रेल्वेकडून दलालांकडून होणारी समस्या थांबविण्यासाठी केल्या गेलेल्या उपायांअतर्गत आता ऑनलाइन एक लॉग.इन वरून केवळ एकच ट्रेनचं तिकीट बुक करता येणार आहे. गर्दीच्या वेळी एक तिकीट बुक केल्यानंतर लगेच बुकिंग सत्र संपून जाईल.
ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.
आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावं, राजकारण गाजवावं अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते. परंतु राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची मात्र अशी काही इच्छा दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मुलानं शुक्रवारी अजमेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी (शिपाई) मुलाखत दिली.
पाकिस्तानातील दहशतवादी आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याने तुरुंगात मटन बिर्यानी मागितलेली नाही, असा धक्कादायक खुलाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलाय.