10
10
खेळाडूंसह पत्नी आणि गर्लफ्रेंडला प्रवास करण्याची परवानगीवर गरमागरम चर्चा सुरू असताना पाकिस्तानचा माजी स्पिनर सकलेन मुश्ताकने खुलासा केला की १९९९ वर्ल्ड कपमध्ये त्याने आपल्या पत्नीला हॉटेलच्या खोलीतील कपाटात लपविले होते.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याच्या आरोपावरून मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जणांना अटक केलीय.
मंगळावर वसाहत करण्यासाठी उपांत्य फेरीत १०० लोकांची निवड करण्यात आली असून या साहसी नागरिकांत ३ जण भारतीय आहेत. त्यात दोन महिला असून एक पुरुष आहे. २०२४ मध्ये यातील पहिले चारजण मंगळावर जातील. मंगळावर जाणारी ही खाजगी सहल असून, त्याअंतर्गत एकदाच मंगळावर जाण्याची सोय आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती.
सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांनी देशात ई-बँकिंग करणाऱ्या बँक ग्राहकांना सावधान केलंय. एक असा व्हायरस सक्रिय झालाय जो आपल्या ई-बँकिंग सेवेवर हल्ला करून आपली गोपनीय माहिती आणि पासवर्ड चोरतात. या व्हायरसला 'क्रायडेक्स' नाव दिलं गेलंय आणि हा एक धोकादायक ट्रोझनचा एक सदस्य आहे.
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखीच अंगावर शहारे आणणारी घटना रोहतकमध्ये घडली आहे. अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडलीय. एवढंच नव्हे तर बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकून ठेवल्याचं समोर आलं आहे. या संतापजनक घटनेची दखल महिला आयोगानं घेतली असून महिला आयोगानं रोहतक पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.
राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्माते यांच्या मागणीत घट झाल्यानं चांदीचा भावही २५० रुपयांनी घटून ३८,३५० रुपये प्रतिकिलो राहिला.
पेट्रोल आण डिझेलच्या किंमती पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल २.४२ रुपये, तर डिझेल२.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
टीम इंडियातून बाहेर असलेला भारताचा धडाकेबाज बॅट्समन विरेंद्र सेहवागनं भारत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवेल, असा विश्वास दर्शवलाय. सेहवाग म्हणाला, नुकत्याच झालेल्या मॅचेसच्या रिझल्टचा चार वर्षांनंतर होणाऱ्या वर्ल्डकपवर विशेष परिणाम होणार नाही.
तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.