पाहा आजपासून काय होतंय स्वस्त आणि काय महाग!

अर्थसंकल्प २०१५-१६मध्ये घोषित केला गेलेल्या सर्व्हिस टॅक्स बदलानंतर आता प्राणीसंग्रहालय, अभयारण्यांमधील प्रवेश तिकीट स्वस्त होणार आहेत. तर बिझनेस क्लासमध्ये विमान प्रवास, म्युचुअल फंड आणि चिटफंडमधील गुंतवणूक महागणार आहे.

PTI | Updated: Apr 1, 2015, 10:45 AM IST
पाहा आजपासून काय होतंय स्वस्त आणि काय महाग! title=

नवी दिल्ली: अर्थसंकल्प २०१५-१६मध्ये घोषित केला गेलेल्या सर्व्हिस टॅक्स बदलानंतर आता प्राणीसंग्रहालय, अभयारण्यांमधील प्रवेश तिकीट स्वस्त होणार आहेत. तर बिझनेस क्लासमध्ये विमान प्रवास, म्युचुअल फंड आणि चिटफंडमधील गुंतवणूक महागणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व्हिस टॅक्समध्ये अनेक बदल केले आहेत. बजेटमध्ये सर्व्हिस टॅक्स वाढवून १४ टक्के केलाय. यापूर्वी सर्व्हिस टॅक्स १२.३६ टक्के होता. आज १ एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतंय. त्यामुळं आजपासून नवीन सर्व्हिस टॅक्सच्या दरानुसार काही सेवांचे दर वाढतील तर काहींचे घटतील. 

या सेवा महागणार -
- विमान प्रवास महागणार
- म्युच्युअल फंड एजंटद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजेच लॉटरी तिकीट मार्केटिंग, सार्वजनिक टेलिफोन, विमानतळ आणि हॉस्पिटलमधील नि:शुल्क फोन कॉल्स आता सर्व्हिस टॅक्स अंतर्गत येणार. 
- चिटफंड संबंधी सेवेत टॅक्स लागणार
- खाद्यपदार्थांच्या रेल्वे वाहतुकीला सर्व्हिस टॅक्समधून मुक्त केलं असून इतर सामानांवरील सेवाकर महागणार आहे. 

- IRCTCची वेबसाइटवर आजपासून एकवेळा एकच तिकीट बुक करता येईल. दुसऱ्या तिकीटासाठी पुन्हा लॉग इन करावं लागेल.
- आजपासून देशभरात प्लॅटफॉर्म तिकीट ५ रुपयांवरून १० रुपये झालंय.
- घर, सिगारेट, तंबाखू महागणार
- कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन महागणार
- आपल्या सेव्हिंग खात्यात मिनिमम बॅलेंस ठेवलं नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं. वेगवेगळ्या शहरांमध्ये ५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. 
- दुसऱ्यांदा चेकबुक घेण्यासाठी ७५ रुपये आणि ब्रांचवर जावून दुसऱ्यांदा पिन घेण्यासाठी ५० रुपये लागतील.
- एक्साइज ड्युटी वाढल्यानं कार महागणार. बजेटमध्ये एक्साइज ड्युटी १२ वरून १२.५ टक्के झालाय.
- कारचं थर्ड पार्टी इंश्युरंस महागणार
- विमा कंपन्यांचे प्रिमियम वाढतील.
- गॅस कनेक्शन आधार कार्डसोबत लिंक केलं नसेल तर सब्सिडी वाले सिलेंडर मिळणार नाही. 

या सेवा सर्व्हिस टॅक्स मुक्त -
- अभयारण्य, प्राणीसंग्रहालयातील तिकीट स्वस्त होणार
- जीवन विमा योजना, ज्येष्ठ पेंशन विमा योजना, अॅम्ब्युलन्स सेवा, फळं आणि भाज्यांच्या किरकोळ पॅकिंगवर कोणताही सर्व्हिस टॅक्स लागणार नाही. 
- लोकगीत आणि शास्त्रीय संगीत कलाकारांची सेवा सर्व्हिस टॅक्समधून बाहेर ठेवली गेलीय, मात्र ती १ लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवी. 
- रेल्वेतून खाद्यपदार्थ पदार्थांच्या वाहतूकीमध्ये सर्व्हिस टॅक्समधून फक्त धान्याच्या वाहतुकीला सूट देण्यात आलीय. ज्यात तांदूळ, दाळ, कणीक, दूध आणि मीठाचा समावेश आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.