गुड न्यूज: आता मॅसेज 'अनसेंड' करणं शक्य!

बऱ्याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मॅसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरं झालं असतं, किंवा एखाद्या ठराविक व्यक्तीला तरी निदान तो मॅसेस पाठवायला नको होता, अशी पश्चातबुद्धी आपल्याला होते.

PTI | Updated: Mar 29, 2015, 10:44 AM IST
गुड न्यूज: आता मॅसेज 'अनसेंड' करणं शक्य! title=

वॉशिंग्टन : बऱ्याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मॅसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरं झालं असतं, किंवा एखाद्या ठराविक व्यक्तीला तरी निदान तो मॅसेस पाठवायला नको होता, अशी पश्चातबुद्धी आपल्याला होते.

पण या मॅसेजेसचं धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं असतं आणि एकदा पाठविला की तो पुन्हा मागे घेता येत नाही, म्हणून आपण हळहळत बसतो. पण आता न्यूयॉर्कमधील एका कंपनीनं पाठविलेला मॅसेज
'अनसेंड' करण्याचं आणि तो ज्याला मिळाला असेल त्याच्या स्मार्टफोनवरूनही तो कायमचा पुसून टाकण्याचं एक नवं‘अ‍ॅप’ विकसित केलं आहे.

'RakEM'असं या अ‍ॅपचं नाव असून त्यामुळं नको असलेला मॅसेज ज्या संवादसाधनावरून (डिव्हाईस) पाठविला त्यावरून आणि ज्यावर मिळाला असेल अशा दोन्ही ठिकाणांहून पुसून टाकता येतो.

या अ‍ॅपमुळे इन्स्टंट मेसेजिंग, फाईल, इमेज अ‍ॅण्ड लोकेशन शेअरिंग, व्हॉईस अ‍ॅण्ड व्हीडिओ कॉलिंग या सर्वांना चिरेबंदी ‘प्रायव्हसी’चं कवच मिळू शकतं, असाही या कंपनीचा दावा आहे.

लोकांच्या आग्रहामुळं न्यूयॉर्कमधील राकेतू 'RakEM'कंपनीनं हे अ‍ॅप विकसित केलं आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पार्कर म्हणाले की, संदेशवहनातील गोपनीयतेवर अतिक्रमणं झाल्याच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असताना आपण पाठवीत असलेले संदेश पूर्णपणे खासगी आणि सुरक्षित राहतील याविषयी लोक आता अधिक आग्रही होऊ लागले आहे. यातूनच हे अ‍ॅप तयार केलं गेलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.