10
10
देशातल्या पेट्रोल पंपमालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद केंद्रिय पेट्रोलियम मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे.
चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.
सत्यम घोटाळा प्रकरणी बी. रामलिंग राजूसह इतर सर्व नऊ आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे
अभिनेता सलमान खानवरील कायदेशीर प्रकरणं कमी होते की काय, म्हणून आणखी एका प्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलीय. सलमानचा बॉडीगार्ड आणि सलमानवर पोलिसांनी हल्ला, मारहाण आणि धमकाविण्याच्या आरोपात गुन्हा दाखल केलाय.
लघु उद्योजकांना तात्काळ कर्ज मिळावे. तसेच छोट्या संस्थाना लाभ मिळावा, यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बॅंकेची घोषणा केली होती. या मुद्रा बॅंकेसाठी २० हजार कोटींची तरतूद केली. या बॅंकेचे पंतप्रधान मोदी यांनी आज उद्घाटन केले.
'आयपीएल-८'ची साल्टलेकमधील युवा भारती मैदानात मंगळवारी रात्री रंगारंग सुरूवात झाली. कार्यक्रम सुरूवातीला ७ वाजता सुरू होणार होता. मात्र पावसामुळं हा कार्यक्रम उशीरानं सुरू झाला. उद्घाटन सोहळल्याला बॉलिवूडचा सुपरमॅन हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरनं आपला जलवा बिखेरला.
आंध्रप्रदेशमधील तिरुपतीजवळ चंदन तस्करी करणारी टोळी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले आहेत.
श्रीलंकेचा डावखुरा फास्ट बॉलर चनाका वेलेगेदारानं घरगुती क्रिकेच मॅचदरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात स्वस्त गोलंदाजी करण्याच्या वर्ल्डरेकॉर्डची बरोबरी केलीय.
सानिया मिर्झा आणि तिची डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगीज जोडीने रशियाच्या एकतरिना मॅकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना जोडीचा 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत, मायामी ओपन वुमन्स डबल्स चॅम्पियनशीपवर नाव कोरलं.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली.