10
10
बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटनं आपल्या डोमेस्टिक लाइन्सवर एसी-२ टायर ट्रेनच्या भाड्यापेक्षाही स्वस्त भाडं दिलंय. सोमवारपासून विमानसेवा तिकीटांवर ही ऑफर सुरू झालीय. कंपनीनं या अंतर्गत १.५० लाख सीट्सवर ही ऑफर दिलीय. विमान प्रवास भाडं असेल अवघे ९९९ रुपये.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि नामांकित उद्योजक रतन टाटा यांनी 'श्याओमी' या चीनी मोबाईल कंपनीचे शेअर्स विकत घेतलेत. चीनी स्मार्टफोन कंपनीत भागिदारी असणारे रतन टाटा हे पहिलेच भारतीय ठरलेत.
भयंकर भूकंपानं शनिवारी देशातील विविध भागांमध्ये कमीतकमी ५१ जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३७ जण जखमी झाले आहेत. या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कार्यवाहक कॅप्टन विरेंद्र सेहवागनं आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं. सोबतच शॉन मार्श आणि डेव्हिड मिलरची स्तुतीही केलीय.
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावलाय. काल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ओव्हरची गती कमी असल्यानं दंड ठोठावण्यात आलाय.
सचिन तेंडुलकरनं तरुण क्रिकेटपटू अंकित केसरीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलंय. १७ एप्रिलला बंगाल क्रिकेट संघाच्या सीनिअर वनडे नॉकआऊट मॅचदरम्यान मैदानात सहखेळाडूला धडकल्यानंतर अंकितचा मृत्यू झाला.
सलामी फलंदाज तमीम इक्बाल आणि विकेटकिकपर फलंदाज मुशफिकर रहीम यांच्या शतकांच्या जोरावर बांग्लादेशने पाकिस्तान विरोधात पहिल्या वनडेमध्ये सहा विकेट ३२९ धावांचा डोंगर उभा केला.
जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आज वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी पोहोचलीय. चीनची ली शुरूई तिसऱ्या स्थानी घसरल्यानंतर सायना पुन्हा पहिल्या नंबरवर पोहोचली.
वीजटंचाईला तोंड देत असलेल्या भारताला कॅनडा या वर्षापासूनच पाच वर्षे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. याबाबात करार करण्यात आला आहे.