दररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं. 

PTI | Updated: Mar 25, 2015, 01:15 PM IST
दररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा title=

सिडनी: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं. 

बांग्लादेशविरुद्ध सेंच्युरी ठोकून फार्मात परतलेल्या रोहितनं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. गुप्टिल तुझा रेकॉर्ड मोडेल, अशी भीती वाटत होती का?, असा प्रश्न विचारला असता, 'रेकॉर्ड तोडण्यासाठीच असतात. मला नाही वाटत की तो तुटावा पण प्रत्येक बॅट्समन मोठी खेळी खेळण्याची इच्छा ठेवतो. दररोज २०० रन्स बनवता येत नाहीत. ते खूप कठीण आहे. जेव्हा मी २६४ रन्स बनवले होते तेव्हा मला सांगितलं गेलं की, मी ३०० रन्स बनवायला हवे होते. लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. जर आपण ३०० रन्स केले तर ३५०ची अपेक्षा असेल. '

रोहित तू खराब शॉट का खेळत नाही, हा प्रश्न विचारताच रोहितनं हसून उत्तर दिलं, 'हा खूपच मजेदार प्रश्न आहे. जर मी चांगला शॉट खेळत असेल तर मला नाही वाटत खराब शॉट खेळण्याची गरज आहे. फक्त चांगले शॉट्स खेळत राहील.' इतके मोठे शॉट्स सहजपणे तू कसा खेळतो, हे विचारलं असता, 'प्रामाणिकपणे सांगू तर मला नाही माहित. मोठे शॉट्स खेळतांना बेसिक्स बरोबर असणं गरजेचं आहे.'

धोनी ऐवजी पत्रकार परिषदेत रोहित कसा काय आला, याबद्दल विचारताच रोहित म्हणाला,' कारण मला पत्रकार परिषदेत यायला सांगितलं केलं होतं.' फिजियो नितीन पटेल, ट्रेनर सुदर्शन आणि मालिशिये रमेश माने यांच्या योगदानाबद्दल विचारलेल्या प्रश्नांनाही रोहितनं उत्तरं दिली. 

दरम्यान, सिडनी स्टेडियमवर उद्या भारतीय पाठीराखे भरपूर संख्येनं असतील असा विश्वास दर्शवत, संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगात न्हालेलं असेल, असं रोहित शर्मा म्हणाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.