10
10
मोठ्या विरोधानंतरही BBCनं निर्भयावरील डॉक्युमेंटरी प्रसारीत केलीच. BBCवृत्तवाहिनीच्या या निर्णयावर निर्भयाच्या आई आणि वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही डॉक्युमेंटरी भारतातही दाखवावी, अशी भूमिका ख्यातनाम गीतकार, खासदार जावेद अख्तर यांनी घेतली आहे.
वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय महिला जेव्हा गर्भावस्थेत असतात, तेव्हा त्यातील ४० टक्के महिलांचं सामान्यपेक्षा कमी वजन असतं, असं एका अभ्यासात पुढे आलंय. जेव्हा की भारतापेक्षा आफ्रिकेत अधिक निर्धन लोक आणि जास्त प्रजनन दर आहे. तरी तिथल्या केवळ १६.५ टक्के गर्भवती महिलांच्या वजनाची टक्केवारी सामान्यपेक्षा कमी आहे.
उदारमतवादाचा बडेजाव मिरवणाऱ्या अमेरिकेत, वर्णभेदाची आणखी एक घटना घडल्याचं समोर आलंय. नवं प्रकरण अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातलं आहे. तिथं एका शाळकरी विद्यार्थ्याला, स्कूल बसमध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागला.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्यातील एका गाडीनं धडक दिल्यानं पादचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
एकीकडे मोबाईल इंटरनेटचे दर वाढत असतांना. बीएसएनएलनं ३जी इंटरनेटच्या दरात कमीत कमी ५० टक्क्यांची कपात करण्याची योजना आखलीय. कंपनीला आपल्या नेटवर्कचा विस्तार करायचाय. हा विस्तार पूर्ण झाला की, ३जी इंटरनेट दरांमध्ये घट करणार आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचं सरकार स्थापनेला दोनच दिवस असताना पीडीपीच्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय. मात्र, चर्चेचा तपशील मिळू शकलेलना नाही.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राला पावलेत. प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये राज्याला १४ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एम.यु.टी.पी अंतर्गत ११ हजार ४४१ कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून राज्यातील रेल्वे विकासासाठी ३ हजार ३७६ कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.
चौदावा वित्त आयोग अहवाल सरकारने स्विकारला आहे. त्यामुळे केंद्रीय करांमध्ये राज्यांना तब्बल ४२ टक्के वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यांना अतिरिक्त निधी मिळणार आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला कायमस्वरुपी प्रतिनिधीत्वास पाठिंब्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शिक्कमोर्तब केले आहे.