जाणून घ्या: ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगसाठीचे नवे नियम

रेल्वेकडून दलालांकडून होणारी समस्या थांबविण्यासाठी केल्या गेलेल्या उपायांअतर्गत आता ऑनलाइन एक लॉग.इन वरून केवळ एकच ट्रेनचं तिकीट बुक करता येणार आहे. गर्दीच्या वेळी एक तिकीट बुक केल्यानंतर लगेच बुकिंग सत्र संपून जाईल.

PTI | Updated: Mar 24, 2015, 05:55 PM IST
जाणून घ्या: ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगसाठीचे नवे नियम title=

नवी दिल्ली: रेल्वेकडून दलालांकडून होणारी समस्या थांबविण्यासाठी केल्या गेलेल्या उपायांअतर्गत आता ऑनलाइन एक लॉग.इन वरून केवळ एकच ट्रेनचं तिकीट बुक करता येणार आहे. गर्दीच्या वेळी एक तिकीट बुक केल्यानंतर लगेच बुकिंग सत्र संपून जाईल.

ही बंदी पुढील प्रवास (एक्सटेंशन तिकीट) किंवा रिटर्न तिकीटच्या इ-तिकीट बुकिंगसाठी लागू असणार नाही. ही बंदी वारंट अंतर्गत डिफेंस बुकिंगमध्ये लागू नसेल.

रेल्वे मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, 'इ-तिकीटमध्ये एक युजरच्या लॉग इन सत्रात एका बुकिंगचं बंधन असेल. त्यानंतर युजरला दुसऱ्या बुकिंगसाठी पहिले लॉग आऊट करणं गरजेचं असेल. हे बंधन आयआरसीटीसी एजंटसह सर्व युजर्सवर लागू असेल.' ही बंदी सकाळी ८ पासून दुपारी २ वाजेपर्यंत इ-तिकीटची बुकिंग करतांनाही लागू असेल.

ही बंदी दलालांना एका युजर लॉगिंगवरून अनेक तिकीट काढण्यावर रोख लावण्यासाठी आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.