10

मदत टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलवा : नेपाळ सरकार

 भूकंपाने संपूर्ण नेपाळ कोलमडून पडला आहे. या विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून नेपाळक़डे मतदीचा ओघ सुरु झाला. गेल्या ९ दिवसांपासून ३४ देशांच्या टीम्स आणि तब्बल १२९ स्निफर डॉग्ज येथे कार्यरत आहेत. मात्र आता या सगळ्या टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलावून घ्यावे, असं आवाहन नेपाळ सरकारनं केलंय.

चीनमध्ये १९ दिवसांत बांधली ५७ मजली इमारत

आपल्या फास्ट विकासासाठी चीन असाच ओळखला जात नाही. तशा घटनाही तिथं घडत असतात. चीनच्या हुनान प्रांतात एका कंपनीनं ५७ मजली मिनी स्काय स्क्रॅपर (इमारत) अवघ्या १९ दिवसांमध्ये पूर्ण केलीय. या इमारतीच्या बांधकामानंतर त्यांचं नाव जगातील सर्वात फास्ट काम करणाऱ्या बिल्डरच्या यादीत सामील झालंय. इमारतींच्या फास्ट बांधकामात चीन जगात सर्वात पुढे आहे. 

भूकंपानंतर नेपाळमध्ये सरोगेट मातांची दु:खद कहानी

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात सरोगेट भारतीय महिलांची दु:खद कहानी समोर आली आहे. सरोगसीचा पर्याय स्विकारणारी इस्त्रायली समलैंगिक जोडपी विशेष विमानाने १५ नवजात बालकांना घेऊन मायदेशी गेले. 

'मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन'

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन असल्याची टीका, अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये केंद्रिय मंत्रीपद भुषविणा-या अरूण शौरी यांनी केली आहे. एका मुलाखतीदरम्यान अरूण शौरी यांनी थेट मत मांडली.

रोमिंगमध्ये मोबाईल कॉल, एसएमएसचे दरात घट

रोमिंगमध्ये मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाठविणे आजपासून स्वस्त झालंय. देशभरातील 'रोमिंग‘चे दर कमी करण्याचा निर्णय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतला आहे.

अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता

रशियानं पाठवलेलं एम-२७एम अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. रशियानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे हे अवकाशयान सोडलं होतं, मात्र यात २४ तासांतच तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाशातच भरकटलेले हे यान झपाटय़ाने पृथ्वीकडे परतत असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. 

उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र

कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नेपाळमधून आतापर्य़ंत ४ हजार भारतीय मायदेशी

नेपाळच्या प्रलयकारी भूकंपामध्ये हजारो भारतीय नागरिक अडकलेत. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक भारतीयांना नेपाळमध्ये वाचवण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी ४ हजार भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलंय. दरम्यान, पावसामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

मोदींनी परदेशात भारताचा आदर्श ठेवावा : काँग्रेस

परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांनी दौऱ्यात बोलताना भान ठेवावे. जगापुढे योग्य आचरण ठेवताना पंतप्रधानांना साजेशी विधाने करावीत, अशी टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यसभेत केली. 

भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी

 संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी मंगळवाली घेण्यात आली. या चाचणीविषयी भारताने गुप्तता बाळली.