10
10
सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव २०० रुपयांनी घटून २८,१०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला.
‘दीया और बाती हम’फेम गौतम गुलाटीनं शनिवारी रात्री रिअॅलिटी शो 'बिग बॉस - हल्ला बोल'च्या आठव्या सिझनचा विजेतेपद जिंकलंय. त्यानं बिग बॉसच्या घरात १३२ दिवस घालवले आणि आपल्या चार स्पर्धकांना हरवलं.
भारतात २०१६ चा टी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. याबाबत गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सांगण्यात आले.
कंधमाल जिल्ह्यातील एका शाळेतील वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली.
जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला.
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी भारत दौऱ्यावर येताना भारतीय ड्रेस डिझायनरलाच पसंती दिली. भारतीय डिझायनर बिभू महापात्र यांनी डिझाइन केलेला नी लेंथचा त्यांनी पोषाख परिधान केला होता.
भारतानं सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखली आहे. परंतु आत्तापर्यंत एकदाही भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराला मिसबाह उल हकला हा इतिहास बदलायचा आहे.
माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.
एमबीबीएसला अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात विविध मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या जवळपास २५०० जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकृत समितीनं जागांच्या वाढीला मंजुरी दिलीय.