10
10
एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतादरम्यान गॉगल घातल्यानं छत्तीसगडच्या बस्तरचे कलेक्टर अमित कटारिया यांना सामान्य प्रशासन विभागानं नोटीस बजावलीय. त्यांच्यासह दंतेवाडाचे जिल्हाधिकारी के. सी. देवसेनापती यांनाही पांढरा शर्ट आणि ट्राऊझर घातल्यामुळं नोटीस बजावण्यात आलीय.
सीबीआयनं सोशल मीडियावर अश्लील एमएमएस क्लिपबद्दलच्या तपासात बंगळुरूतून एका मुख्य आरोपीला अटक केलीय.
IPLच्या देशभरातील बुकींवर EDनं छापे मारल्याची बातमी येतेय. काल दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि देशातील अन्य भागांतील सक्रीय बुकींवर EDनं छापे मारलेत.
राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं.
अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.
अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला प्रवास करायचा असतो. ज्याबद्दल आपण आधी ठरवलेलं नसतं आणि वेळेवर आपल्याला रेल्वेचं तिकीट मिळत नाही. मात्र आता लवकरच आपली या समस्येतून सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच आपली 'तात्काळ स्पेशल' रेल्वे सुरू करणार आहे. ही रेल्वे केवळ बिझी सिझनमध्ये चालवली जाईल आणि या प्रवासासाठी आपल्याला आपला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल.
अभिनेता सलमान खानच्या सुटकेवर वादग्रस्त ट्विट करणा गायक अभिजीत भट्टाचार्य आणि फराह अली खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता चांगलेच महागात पडले आहे.
अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत काल्पनिक शंकाकुशंकांना स्थान नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर आपली रोखठोक मतं मांडली.
मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे.