मॉस्को : रशियाचे एक मासेमारी करणारे जहाज समुद्रात बुडाले. यामध्ये ५४ जणांना जलसमाधी मिळाली. या जहाजावर १३२ लोक होते.
५४ लोकांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती रशियाच्या न्यूज एजन्सीने दिली. तसेच जहाजावरील ६३ चालकांना वाचविण्यात येश आहे. मात्र, जहाजावरील १५ खलाशी बेपत्ता आहेत.
रशियाच्या पूर्व भागाच्या दक्षिण समुद्र तटकिनाऱ्यापासून २५० किलोमीटर दूर डेल्नी वोस्तोक कामचात्का किनाऱ्याजवर जहाज बुडाले. स्थानिक जहाजांच्या मदतीने मदतकार्य करण्यात आले. या दुर्घटनेची माहितीसाठी आणि बचाव कार्यासाठी सरकारकडून काय करण्यात येत आहे, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.