10

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ ठार

जम्मू आणि काश्मीरमध्ये आज सकाळी दहशतवादी हल्ला करण्यात आला. जोरदार गोळीबार केल्याने यात एका पोलिासाचा मृत्यू झाला.

ट्युनिशियात संग्रहालयावर दहशतवादी हल्ला, 22 ठार

दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानं टु्यनिशियाची राजधानी टु्यनिस शहर हादरलं. इथल्या प्रसिद्ध बार्डो वस्तुसंग्रहालयात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यात 17 विदेशी पर्यकांसह 22 जण ठार झाले. 

संगकारा सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत

वर्ल्डकप २०१५मध्ये अनेक विक्रम प्रत्येक जण आपल्या नावावर करीत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे विक्रम मोडीत काढण्यासाठी श्रीलंकेचा कुमार संगकारा तयारीत आहे.

दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश

नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

नोकरी करणाऱ्यांना मिळणार कमी पगार, पीएफचा जादा भार

कर्मचाऱ्यांच्या पगारावर आता पीएफचा जादा भार पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण वेतन पीएफसाठी गृहीत धरण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. त्यामुळे कामगारांसहित त्यांना सेवेत सामावून घेणाऱ्या मालकांनाही दरमहा योगदानाचा जादा भार सोसावा लागणार आहे. 

राहुल गांधी यांची चौकशी सर्वसामान्य : दिल्ली पोलीस

दिल्ली पोलिसांची ही चौकशीची प्रक्रिया सर्वसामान्य असल्याचा खुलासा, दिल्लीच्या पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी केला आहे. या चौकशीचा केंद्र सरकार तसंच केंद्रीय गृहमंत्रालयाचा काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

सोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक

जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.

सायना नेहवालची ऑल इंग्लंड ओपन फायनलमध्ये धडक

भारताची अव्वल बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारत इतिहास रचला आहे. ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटन प्लेअर ठरलीय.

हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालू - श्रीलंकन पंतप्रधान

भारतीय मच्छीमार श्रीलंकन सागरी हद्दीत दिसल्यास गोळी मारणार, असे धक्कादायक वक्यव्य श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केलेय. श्रीलंकेनं दिलेल्या इशाऱ्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली आहे.

अबब! एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया

मध्य प्रदेशमधील कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत झालेला गोंधळ सर्वज्ञात असतांनाच एका तासात तब्बल २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार इलाहाबादमध्ये समोर आलाय.