नाशिक कारागृहात आरोपीची शाही बडदास्त

मुंबईच्या हीट एन्ड रन प्रकरणातील आरोपी एलिस्टर परेराला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शाही बडदास्त मिळतंय. जेलमध्येही त्याला रपेट मारण्यासाठी मर्सिडीज पुरवली जाते. या शाही वागणुकीचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर, गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Updated: Jun 2, 2012, 09:55 AM IST

www.24taas.com, नाशिक

 

मुंबईच्या हीट एन्ड रन प्रकरणातील आरोपी एलिस्टर परेराला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शाही बडदास्त मिळतंय. जेलमध्येही त्याला रपेट मारण्यासाठी मर्सिडीज पुरवली जाते. या शाही वागणुकीचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर, गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिलंय.

 

मुंबईच्या फुटपाथवर सात जणांना आपल्या गाडीखाली चिरडणारा एलिस्टर परेरा... 2006 साली घडलेल्या घटनेनंतर  सुप्रीम कोर्टापर्यंत धावाधाव करुनही त्याला अखेर शिक्षेला सामोरं जावं लागलंय.

 

सध्या नाशिक जेलमध्ये असलेल्या या धनिक पुत्राची एवढ्या मोठ्या घटनेनंतरही ड्रायव्हिंगची हौस फिटलेली नाही...आणि धक्कादायक बाब म्हणजे ही हौस पुरवली जातेय खुद्द जेल प्रशासनाकडून... आपल्या अलिशान मर्सिडीजमधून जेलमध्ये कशा पद्धतीनं तो रपेट मारतोय.

 

जेल प्रशासनाच्या मदतीमुळंच खुलेआम तो हे सगळे उद्योग करतोय.. यावरुन त्याला तुरुगांच्या कोठडीत काय सुविधा मिळत असतील, याची कल्पनाच केलेली बरी...  जेलमध्ये राहूनही त्याला मिळणारी ही शाही वागणूक तरुंग प्रशासनाबाबत प्रश्न उपस्थित करणारी आहे..

 

पैसा असेल तर तुरुंगातही कैद्यांना कशी शाही बडदास्त मिळते याचं नाशिक कारागृहातलं हे एकच उदाहरण नाही. यापूर्वीही अशा घटना या तुरुंगात घडल्याचं उघड झालय.. मात्र केवळ चौकशीपुरती कारवाई न रहाता, जरब बसवणा-या कारवाईची खरी गरज आहे..