बळीराजा ठरलाय नाशिक अर्थव्यवस्थेचा कणा

पाच हजार आठशे एक कोटी रुपयांचा विक्रमी पतपुरवठा करण्याचा आराखडा नाशिक जिल्ह्याने तयार केला आहे. हा आरखडा केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वांत मोठा आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज कृषी क्षेत्रात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील बळीराजा घेणार आहे.

Updated: Jul 4, 2012, 08:57 PM IST

www.24taas.com, नाशिक 

पाच हजार आठशे एक कोटी रुपयांचा विक्रमी पतपुरवठा करण्याचा आराखडा नाशिक जिल्ह्याने तयार केला आहे. हा आरखडा केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वांत मोठा आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज कृषी क्षेत्रात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील बळीराजा घेणार आहे.

कांदा द्राक्ष डाळिंब अशा पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यानं सातासमुद्रापार आपली पिकं पाठवून नावलौकीक मिळविला. आराखड्याच्या तब्बल साठ टक्के कर्ज हे नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील कष्टकऱ्यांनी घेतलंय. गेल्या वर्षी चार हजार कोटी रुपयांदरम्यान असलेला हा पतपुरवठा साडे सात हजार कोटींवर गेला होता. शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेने बनविलेल्या आराखड़्याने नाशिकची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांमुळे बलशाली असल्याचं स्पष्ट झाले आहे.

यामध्ये कृषी पूरक उद्योग वाईनचा ही समावेश आहे. निर्यात करणारे ओद्योगिक युनिटसही  यात मागे नाहीत. जिल्ह्यातील साडे चारशे बँकामध्ये कर्जवाटपाचा उत्साह नाशिकमध्ये दिसून येतो आहे तो परतफेडीमुळे. यावर्षी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे सात हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नाशिकच्या शेतकरी आणि उद्योजकांनी आपली पत सातत्याने वाढविली आहे. या विक्रामी कर्ज पुरवठ्याने नाशिकच्या प्रगतीचा आलेख यावर्षीही चढताच राहणार हे निश्चित.