Rishabh Pant ODI Stats: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी झाली. संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शनिवारी (18 जानेवारी) ही घोषणा केली. यामध्ये अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. अनपेक्षित अशी खेळाडूंची निवड बघायला मिळाली. जबरदस्त फॉर्मात असलेला यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनची (Sanju Samson vs Rishabh Pant ODI Stats) निवड करण्यात आली नाही. संजू सॅमसनचे नाव यंदा खूप चर्चेत होते. गेल्या 5 टी-20 सामन्यांमध्ये संजूने 3 शतके झळकावली आहेत. याशिवाय डिसेंबर २०२३ मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने शतक ठोकले होते.
संजू सॅमसनची निवड न झाल्यामुळे असा गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये त्याला सतत बाजूला केले जात असल्याचे दिसून येत आहे. २०२४ च्या T20 विश्वचषकात त्याला फक्त अमेरिका-वेस्ट इंडिजमधेही फक्त बघायची भूमिका करायला ठेवण्यात आले होते. त्याला या स्पर्धेत एकही सामना खेळता आला नाही. एवढचं नाही तर त्याआधी संजू सॅमसनची २०२३ च्या वनडे विश्वचषकात निवड झाली नव्हती. वास्तविक, ज्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला जातो, त्या वर्षी सॅमसनला T20 मध्ये संधी दिली जाते आणि ज्या वर्षी T20 विश्वचषक आयोजित केला जातो तेव्हा त्याला वन डे संघात ठेवले जाते.
हे ही वाचा: "बायकांना काही कळत नाही...".युवराज सिंगचे वडिलांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
संजू सॅमसनला वगळल्याने चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे की पंतची निवड करणे योग्य निर्णय होता का? कसोटी क्रिकेटमध्ये पंत हा भारताचा पहिला-पसंतीचा यष्टिरक्षक आहे, पण तो फारसा पांढरा चेंडू क्रिकेट खेळला नाही, विशेषत: एकदिवसीय सामने त्याने खेळलेले नाही. 2022 पासून पंतच्या नावावर फक्त 1 वनडे आहे.
हे ही वाचा: स्तुती की छळ? महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीसोबत रील्स काढण्यासाठी जमली गर्दी, Video Viral
16 एकदिवसीय सामन्यांमध्ये संजू सॅमसनची सरासरी 56.7 आहे. त्याने ५१० धावा केल्या ज्यात, तीन अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतने 31 सामन्यात 33.5 च्या सरासरीने 871 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. सॅमसनने 21 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. सॅमसनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर धडाका लावला आणि त्याला अखेरीस पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
हे ही वाचा: 'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न
India's squad for the #ChampionsTrophy 2025 announced!
Drop in a message in the comments below to cheer for #TeamIndia pic.twitter.com/eFyXkKSmcO
— BCCI (@BCCI) January 18, 2025
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल.