मनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत
नाशिकमध्ये जनादेशाचा आदर केला जाईल असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेनेनं महापौरपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशीची चर्चा आहे.
Mar 9, 2012, 07:48 PM ISTमनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!
मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत
Mar 9, 2012, 05:44 PM ISTनाशिक महापौरपदाचा गुंता वाढला
नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
Mar 9, 2012, 05:44 PM ISTनाशकात शिवसेनेचे मनसेवर दबावतंत्र?
नाशिकमध्ये शिवसेनेने मनसेवर दबावतंत्र वापरण्यास सुरूवात केली आहे. हे दबावतंत्र आहे, महापौर निवडणुकीसाठी. नाशिकमध्ये मनसेने जास्त जागा पटकावून नंबर एकचा पक्ष म्हणून स्थान पटकावले आहे. परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत नसल्याने सत्तेसाठी मनसेला कसरत करावी लागणार आहे. याच संधीचा लाभ उठवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यासाठी दबावतंत्रचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
Mar 8, 2012, 11:00 PM ISTराज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम
महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.
Mar 2, 2012, 08:16 AM ISTनाशिकमध्ये चोरट्यांचा धुडगूस
नाशिकमध्ये वाहनं जाळपोळीच्या घटनांनी धुडगूस घातला असतानाच नागरिकांना आता चोरट्यांनीही हैराण केलं आहे. वाढत्या चोऱ्याची नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
Mar 1, 2012, 01:01 PM ISTबोगस मतदान अहवाल देण्याचे आदेश
नाशिकच्या मतदार यादीत तब्बल सव्वा लाख नावं बोगस आढळलीत. ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर निवडणूक आयोगानं सात तारखेपर्यंत अहवाल सादर कऱण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
Feb 29, 2012, 07:25 PM ISTबोगस व्होटिंग - अजूनही कारवाई नाहीच
नाशिकमधल्या बोगस व्होटिंग प्रकरणी अजून कुणावरही कारवाई झालेली नाही. हा प्रकार उघड करुन पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासन ढिम्मच आहे.
Feb 28, 2012, 05:56 PM ISTमनसेचे नगरसेवक अज्ञातस्थळी
नाशिकमधील मनसेचे सर्व ४० नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. फोडाफोडीच्या राजकाणात मनसेची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे महापौरपदाची चुरस शिगेला पोहचली आहे.
Feb 23, 2012, 10:43 PM ISTराज्यातील रक्तरंजीत राडे
राज्यात महापालिका निवडणुकांनंतर आता रक्तरंजीत राजकीय राड्याला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि नागपुरात राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्या आहेत तर पुणे आणि नाशकातही तोडफोड करण्यात आली आहे.
Feb 22, 2012, 12:45 PM ISTनाशिकमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक
बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीनं नाशिकमधील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर इथल्या गुन्हेगारीनं उच्चांक गाठला आहे. निवडणूक काळात शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये तेहतीसहून अधिक गुन्हे झाले आहेत.
Feb 21, 2012, 09:57 PM IST'बंडखोराला भुजबळांनी रसद पुरवली'
नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीच्या पराभवामुळं पक्षात अंतर्गत वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. समीर भुजबळ यांनीच बंडखोराला रसद पुरविल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
Feb 18, 2012, 07:11 PM ISTनाशकात नवं समीकरण, मनसे-भाजप युती?
नाशिकमध्ये सत्तेसाठी नवी समीकरणे पाहायला मिळणार आहे. मनसे आणि भाजपची युतीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे महापौर मनसेचा, उपमहापौर भाजपचा होण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष नेतेमंडळीनी याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे सांगून चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात भिरकावला आहे.
Feb 18, 2012, 06:29 PM ISTपैसेवाटपावरून मनसेचा राडा
नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.
Feb 16, 2012, 05:32 PM ISTनाशिक अपघातात तीन ठार
साईदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भक्तांवर आज काळाचा घाला झाला. मनमाड-नगर राज्यमहामार्गावर येवलाजवळ आज शनिवारी पहाटे मालट्रक आणि इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने इंडिका मालट्रकवर धडकली. मृतांमध्ये उच्च न्यायालयातील वकीलाचा समावेश आहे.
Feb 11, 2012, 05:42 PM IST