"बायकांना काही कळत नाही...".युवराज सिंगचे वडिलांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

Yograj Singh Reaction: आता युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.     

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 19, 2025, 09:15 AM IST
"बायकांना काही कळत नाही...".युवराज सिंगचे वडिलांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान title=

Yograj Singh: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नवी पॉलिसी लागू केली आहे. या पॉलिसीमध्ये अनेक कठोर नियम आहेत. यामध्ये परदेश दौऱ्यांवर खेळाडूंसोबत जाणाऱ्या पत्नी आणि कुटुंबावरही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल टीम इंडियाच्या खेळाडूंनाही शिक्षा होणार आहे. आता युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग (Yograj Singh) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

योगराज सिंग यांनी केली टीका 

योगराज सिंग यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) या नव्या पॉलिसीचे समर्थन केले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार 45 दिवसांच्या दौऱ्यात पत्नी आणि कुटुंबातील सदस्य केवळ 14 दिवस खेळाडूंसोबत राहू शकतात. योगराज सिंह म्हणाले, " जेव्हा एखादा संघ दुसऱ्या देशाचा दौरा करत असतो, तेव्हा कुटुंबाला सोबत घेऊन जाण्यात काय अर्थ आहे. ते तुमचे लक्ष विचलित करते."

बायकांना क्रिकेटबद्दल काय माहिती आहे?

पुढे योगराज सिंह म्हणाले, "निवृत्तीनंतर तुम्ही काहीही करू शकता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असाल, तेव्हा तुमच्या शेफला सोबत घेऊन जाणे अधिक ओझे होऊन जाते. बायकांना खरंच क्रिकेटबद्दल जास्त माहिती नसते, मग तुम्हाला तुमची ,मुलं आणि बायको सोबत कशाला हवे?  जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा संघ हे तुमचे कुटुंब असते, मला वाटत नाही की त्याची गरज आहे. मी याच्या विरोधात आहे." 

निवडकर्त्यांचे अभिनंदन केले

योगराज सिंग यांनी शनिवारी जाहीर झालेल्या 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या संघाच्या निवडीवरही आपले मत मांडले. योगराज सिंगने संघाच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाला, "रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल आणि शुभमन गिल उपकर्णधार असेल. भविष्यात गिलला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे." 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल.