www.24taas.com, नाशिक
नाशिक जिल्ह्यातल्या बाडगी शासकीय आश्रमशाळेतल्या गर्भवती विद्यार्थिनी प्रकरणात हेमराज चौधरी या युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हेमराजला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
आरोपी हेमराज चौधरी हा बाडगी गावातलाच रहिवासी असून तो शेतमजुरी करतो. बाडगी शासकीय आश्रमशाळेत शिकणारी एक आदिवासी विद्यार्थिनी गर्भवती अवस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडालीय.
१६ वर्षांची ती विद्यार्थिनी दहावीत शिकतेय. शाळेत वैद्यकीय तपासणीच्यावेळी हा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणानं पुन्हा एकदा आदिवासी विकास विभाग काय करतंय ? असा प्रश्न उपस्थित झालाय.