महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाची जगभर चर्चा; मुंबईत खोल समुद्राच्या आत 250 km च्या स्पीडने धावणार बुलेट ट्रेन

देशातील पहिला सागरी बोगदा आपल्या महाराष्ट्रात उभारला जात आहे. बुलेट ट्रेनसाठी हा सागरी बोगदा निर्माण केला जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 18, 2025, 07:13 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाची जगभर चर्चा; मुंबईत खोल समुद्राच्या आत 250 km च्या स्पीडने धावणार बुलेट ट्रेन title=

Mumbai Ahmedabad Bullet Train:  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाची जगभर चर्चा सुरु आहे.  बुलेट ट्रेनच्या कामाने महाराष्ट्रात चांगलीच गती पकडली आहे. बुलेट ट्रेननचा मार्ग समुद्राच्या पोटातुन जात आहे.  खोल समुद्राच्या आत बांधल्या जाणाऱ्या बोगद्यातुन 250 km च्या स्पीडने  बुलेट ट्रेन धावणार आहे. मागील 9 वर्षांपासून बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे. 

बुलेट ट्रेन हा मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.  मुंबई अहमदाबाद असं बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. महाराष्ट्र ते गुजरात या मार्गावर भारतातील पहिली बुलेट धावणार आहे.   बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईच्या BKC येथून सुरुवात झाली. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. हा बोगदा देशातील पहिलाच समुद्राखालून निघणारा बोगदा आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे.

मुंबईच्या समुद्रमार्गातून आणि देशातला पहिला 21 किलोमीटरच्या बोगद्याचं काम सध्या सुरू आहे. या कामासाठी विविध ठिकाणी यार्ड आहेत. नवी मुंबईतील महापे येथे कास्टिंग यार्ड आहे. या ठिकाणी बोगद्यामध्ये लागणाऱ्या रिंग्स तयार करण्याचं काम सुरू आहे. 

21 किलोमीटर बोगद्यातून ही बुलेट ट्रेन धावणार आहे. तर 7 किलोमीटर ही समुद्रखालून जाणार आहे. या बोगद्यासाठी  लागणाऱ्या रिंग 7 हजार 700 रिंग तयार करण्यात येत आहेत. 77 हजार गोलाकार तयार करण्यात येत आहेत.याला नंबर आणि क्यू आर कोड ने लावण्यात येणार आहे

शिळफाटा येथे ३९४ मीटर बोगद्याचं काम पूर्ण झाला आहे. बीकेसी येथे1562 पैकी 622 मीटर आणि अहमदाबादच्या दिशेनं 1628 पैकी 489 मीटर बोगद्याचे काम पूर्ण झालं आहे.  रेल्वे अश्विनी वैष्णव यांनी घणसोली येथील बोगद्याजवळ केलेल्या एक्सेस बोगदा येथे जाऊन पाहणी केली . यावेळी अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. 

गुजरात मध्ये वेगाने सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला महाराष्ट्रात मात्र ब्रेक लागला होता गेल्या दोन वर्षापासून बुलेट ट्रेन च्या कामाला पुन्हा एकदा वेग घेतला आहे 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हे काम पूर्ण होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे.