मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ

मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ

 हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे मनोहर लाल खट्टर एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. याशिवाय भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या शपथविधीला हजेरी लावली.

Oct 26, 2014, 02:51 PM IST
प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा

प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा

काँग्रेसला विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी विधीमंडळ पक्षनेते पदासाठी आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. 

Oct 25, 2014, 03:23 PM IST
शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार, युतीबाबत भाजप नेत्यांचा विरोध

शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार, युतीबाबत भाजप नेत्यांचा विरोध

राज्यात कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भाजपने युटर्न घेतला आहे. भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी शिवसेनेसोबत युती करण्याबाबत राज्यातील भाजप नेत्यांचा तीव्र विरोध आहे.

Oct 25, 2014, 02:47 PM IST
शिवसेनेची कोकणात बाजी, भाजपला पाजलं पाणी

शिवसेनेची कोकणात बाजी, भाजपला पाजलं पाणी

राज्यात कोकण वगळता मुंबई, मराठवाडा, विदर्भात भाजपानं विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारलीय. विधानसभा निवडणुकीत कोकणात शिवसेनेनं भाजपला पाणी पाजलंय.

Oct 25, 2014, 12:41 PM IST
फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की नितिन गडकरी यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजचीही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. 

Oct 25, 2014, 11:37 AM IST
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंद - वैद्य

फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंद - वैद्य

 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, अशा शब्दांत संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी संघाचा कल कोणाकडे आहे, याचे संकेत दिलेत. 

Oct 25, 2014, 09:11 AM IST
पंतप्रधान मोदींचे उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचे निमंत्रण

पंतप्रधान मोदींचे उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ ऑक्टोबरला एनडीए सरकारमधल्या मित्रपक्षांसाठी स्नेहभोजन आयोजित केलंय. या स्नेहभोजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मोदींनी आमंत्रण पाठवलंय. 

Oct 25, 2014, 07:49 AM IST
खडसेंना मुख्यमंत्री करा – खान्देशातून मागणी

खडसेंना मुख्यमंत्री करा – खान्देशातून मागणी

काँग्रेस, भाजपा कोणत्याही पक्षाने आजपर्यंत उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला नाही.. त्यामुळं एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी आता खानदेशातील आमदारांकडून होऊ लागलीय.. 

Oct 24, 2014, 01:50 PM IST
शपथविधीसाठी भाजपकडून वानखेडे स्टेडिअम बूक

शपथविधीसाठी भाजपकडून वानखेडे स्टेडिअम बूक

भाजपकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय.. भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियम बुक केलंय. 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी वानखेडेचं बुकिंग करण्यात आलंय.. वानखेडेवरच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Oct 24, 2014, 12:21 PM IST
मनसेच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

मनसेच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल ३ हजार ७३० उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नसल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, किमान मते न मिळाल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.

Oct 24, 2014, 11:10 AM IST
शिवसेनेची बोळवण, केंद्रात एक, राज्यात दोनच मंत्रिपदे मिळणार?

शिवसेनेची बोळवण, केंद्रात एक, राज्यात दोनच मंत्रिपदे मिळणार?

 भाजप आणि मित्र पक्षांना मिळून निवडणुकीत १२३ जागा मिळाल्या आता बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ २२ आमदारांची गरज आहे. 

Oct 24, 2014, 09:15 AM IST
फडणवीसांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा?

फडणवीसांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा?

भाजपामधले मुख्यमंत्रीपदाचे दोन प्रबळ दावेदार नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची आज नागपूरात भेट झाली. महाल भागातल्या गडकरींच्या घरी सुमारे अर्धा तास ही भेट झाली.

Oct 23, 2014, 12:35 PM IST
यंदा विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार

यंदा विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार

राजकारण म्हटले की पुरूषांचे वर्चस्व असते. पण यंदा आपणही कमी नाही आणि राजकारणात आपणही पुरूषांना धूळ चारू शकतो, हे राज्यातील विविध पक्षांच्या नवनिर्वाचित २० महिला आमदारांनी दाखवून दिले आहे. 

Oct 23, 2014, 09:43 AM IST
राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले

राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले

संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.

Oct 23, 2014, 09:02 AM IST
पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा

पराभवाची जबाबदारी स्वीकारून दरेकरांनी दिला राजीनामा

मनसेचे नेते प्रवीण दरेकर यांनी अखेर आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

Oct 22, 2014, 11:00 PM IST
‘गडकरींसाठी राजीनामा द्यायलाही तयार’

‘गडकरींसाठी राजीनामा द्यायलाही तयार’

सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नितीन गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावं अशी, मागणी भाजपचे काही खासदार करताहेत. गडकरी राज्यात परतणार असतील तर त्यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दाखवली आहे.

Oct 22, 2014, 10:45 PM IST
भाजप-सेना सरकारबाबत संभ्रम कायम

भाजप-सेना सरकारबाबत संभ्रम कायम

भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का याबाबत अद्याप संभ्रम काय आहे. एकीकडे भाजपाने सत्ता स्थापनेसाठी स्वतःहून शिवसेनेची मदत मागायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे. तरीही भाजपाकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.

Oct 22, 2014, 09:21 PM IST
Update: गडकरी समर्थक आमदारांवर कारवाई होणार

Update: गडकरी समर्थक आमदारांवर कारवाई होणार

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाकरता केंद्रीय दळण वळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना जाहीरपणे समर्थन देण्याचा प्रकार भाजपच्या विदर्भातील आमदारांना महागात पडणार आहे. 

Oct 22, 2014, 08:07 PM IST
शिवसेनेचे आम्हाला कुणी भेटलेच नाही - भाजप

शिवसेनेचे आम्हाला कुणी भेटलेच नाही - भाजप

शिवसेना नेत्यांना भाजप नेते भेटलेच नाहीत असं आता पुढे आले आहे. आम्हाला कुणी भेटलीच नाही, अशी माहिती भाजपचे महाराष्ट्राचे निरीक्षक जे. पी. नड्डा यांनी दिलीय. दरम्यान, दिवाळीनंतर राजनाथ सिंह तसंच भाजपचे केंद्रीय नेते आणि मंत्र्यांशी शिवसेना चर्चा करणार असल्याचं सेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितले.

Oct 22, 2014, 03:08 PM IST
शिवसेनेची दिल्लीत भाजप नेत्यांशी पडद्याआड चर्चा

शिवसेनेची दिल्लीत भाजप नेत्यांशी पडद्याआड चर्चा

शिवसेना नेते दिल्लीहून मुंबईत परतलेत. मात्र, शिवसेना नेत्यांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, युतीसंदर्भातील निर्णय पक्षातर्फेच घेतले जात असल्याने यावर सविस्तर चर्चा करुन पुढील निर्णय घेतले जातील, असे भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेसोबतच्या युतीबाबत भाष्य केले.

Oct 22, 2014, 01:04 PM IST