नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ ऑक्टोबरला एनडीए सरकारमधल्या मित्रपक्षांसाठी स्नेहभोजन आयोजित केलंय. या स्नेहभोजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मोदींनी आमंत्रण पाठवलंय.
आता उद्धव ठाकरे पंतप्रधानांनी दिलेलं आमंत्रण स्वीकारत स्नेहभोजनाला जाणार का ते पाहण महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा द्याचया की नाही, याबाबत शिवसेनेमध्ये खल सुरु आहे. सेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही, अशी परिस्थिती आहे. दोन्हींकडून सत्ता स्थापण्यासाठी हालचाली आहे. मात्र, चर्चा मात्र गुप्त ठेवण्यात आली आहे.
भाजपचे मित्र पक्ष नेते रामदास आठवले यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. शिवसेना - भाजपामध्ये झालेला डेडलॉक तोडण्यासाठी काल रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. झालं गेलं विसरून शिवसेना-भाजपानं एकत्र सरकार स्थापन करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टीला दोनी मंत्रिपदं मिळावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असं सांगण्यात येत आहे.. मात्र शिवसेनेचे सर्व खासदार या मेजवानीला उपस्थित राहाणार आहेत. येत्या रविवारी पंतप्रधानांनी एनडीएच्या सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.