यंदा विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार

मुंबई : राजकारण म्हटले की पुरूषांचे वर्चस्व असते. पण यंदा आपणही कमी नाही आणि राजकारणात आपणही पुरूषांना धूळ चारू शकतो, हे राज्यातील विविध पक्षांच्या नवनिर्वाचित २० महिला आमदारांनी दाखवून दिले आहे. 

गेल्या विधानसभेच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता. विधानसभेत केवळ ११ महिला होत्या. नव्या विधानसभेतील सर्वाधिक १२ महिला आमदार भाजपाच्या आहेत. तसेच ५ काँग्रेसच्या, तर ३ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत.

यंदा तब्बल २७६ महिला निवडणूक रिंगणात होत्या. १९९५ ते २००९ या काळात विधानसभेतील महिलांची संख्या ११-१२ पर्यंतच मर्यादित होती. त्यापूर्वीही केवळ १९८० मध्ये सर्वाधिक १९ महिला निवडून आल्या होत्या. आता २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत महिलांची टक्केवारी ७.२ टक्के झाली आहे.

पाहा पक्षनिहाय महिला आमदार 

भाजप

* मनिषा चौधरी - दहिसर

* विद्या ठाकूर - गोरेगाव 

* डॉ. भारती लव्हेकर - वर्सोवा 

* मंदा म्हात्रे (बेलापूर)

* मेधा कुलकर्णी ( कोथरूड)

* देवयांनी फरांदे (नाशिक मध्य)

* सीमा हिरे (नाशिक पश्चिम)

* संगीता ठोंबरे (केज)

* पंकजा मुंडे (परळी)

* स्नेहलता कोल्हे (कोपरगाव)

* मोनिका राजाळे (शेवगाव)

* माधुरी मिसाळ (पर्वती)

काँग्रेस 

* यशोमती ठाकूर - तिवसा 

* अमिता चव्हाण - भोकर

* वर्षा गायकवाड - धारावी

* प्रणिती शिंदे - सोलापूर

* निर्मला गावित - इगतपुरी

राष्ट्रवादी काँग्रेस 

* दीपिका चव्हाण - बागलाण

* संध्यादेवी कुपेकर - चंदगड

* ज्योती कलानी - उल्हासनगर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
20 woman repensentation in 2014 maharashtra assembly
News Source: 
Home Title: 

यंदा विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार

यंदा विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार
Yes
No