मुंबई : भाजपकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय.. भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियम बुक केलंय. 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी वानखेडेचं बुकिंग करण्यात आलंय.. वानखेडेवरच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दिवाळी संपल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची म्हणजेच आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी जे. पी. नड्डा आणि राजनाथ सिंह हजर राहतील. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित झाला की लगेचच मंगळवार किंवा बुधवारी नव्या राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह प्रमुख चार ते पाच मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यात शपथविधी पार पडेल, अशी शक्यता आहे.
यात प्रामुख्याने एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारणतः आठवड्याभरात पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.