चंदीगड : हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे मनोहर लाल खट्टर एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. याशिवाय भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या शपथविधीला हजेरी लावली.
सकाळी अकरा वाजता पंचकुलाच्या सेक्टर 5 मध्ये असलेल्या हुड्डा मैदानात हा जंगी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्यात कॅप्टन अभिमन्यू, अनिल विज आणि ओपी धनगड हे भाजपचे नेते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. हरियाणा हे जाटबहुल राज्य असलं तरी १८ वर्षानंतर पहिल्यांदा जाट नसलेल्या व्यक्तीला राज्याची धुरा मिळालेली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.