Update: गडकरी समर्थक आमदारांवर कारवाई होणार

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाकरता केंद्रीय दळण वळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना जाहीरपणे समर्थन देण्याचा प्रकार भाजपच्या विदर्भातील आमदारांना महागात पडणार आहे. 

Updated: Feb 2, 2015, 04:04 PM IST
Update: गडकरी समर्थक आमदारांवर कारवाई होणार  title=

live update:  नागपूर सकाळी १०.४५  वाजता

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाकरता केंद्रीय दळण वळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना जाहीरपणे समर्थन देण्याचा प्रकार भाजपच्या विदर्भातील आमदारांना महागात पडणार आहे. 

या प्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दाखल घेतली आहे. मंगळवारी मुंबईहून परतल्यावर विदर्भातील आमदारांनी उघडपणे गडकरी यांना समर्थन जाहीर करत त्यांनाच राज्याचा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती.

 
इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी आमदारांनी गडकरी यांच्याकरीता आपला मतदार संघ सोडत राजीनामा देण्याची तयारी देखील दर्शवली होती. या प्रकारची गंभीर दाखल पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. 
उघडपणे या प्रकारे बोलणाऱ्या आमदारांनी शिस्त भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांना समज दिली जाणार आहे. या महिन्याच्या २९ तारखेला ही कारवाई होण्याची शक्यता असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले.

 

live update: सकाळी ७ वाजता

शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात भाजपसमोर काही अडसर आहेत. त्यांना काही गोष्टी भविष्यात कराव्या लागणार असल्याने शिवसेनेला सत्तेत घ्यावे की नाही याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

१) विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या ४५ जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले तर पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला त्यांच्या विद्यमान आमदारांना जागा सोडण्याचे बंधन भाजपला असणार आहे.

२) मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरी भागात भाजपाची ताकद शिवसेनेपेक्षा वाढली आहे. येत्या दोन वर्षात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत स्वबळावर लढून सत्ता प्राप्त करणे भाजपला शक्य आहे. त्यामुळे या परिस्थती शिवसेनेला स्वतःहून बिनशर्त पाठिंबा द्यायचा असेल तर द्यावा अशी भाजप भूमिका आहे. 

कालच्या घडामोडी 

भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना तयार असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलंय. त्यासंदर्भात प्राथमिक बोलणी दिल्लीत झाली आणि सविस्तर बोलणी दिवाळी संपल्यावर होणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर आधी मनं जुळू देत, मग एकत्र येऊ, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिलीय. 

दरम्यान, भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कसलीही स्पर्धा सुरू नाही, असा दावा भाजप नेते विनोद तावडे यांनी आज पुन्हा एकदा केलाय...

शिवसेना-भाजप पुन्हा युती होण्यासंदर्भात काल रात्री बोलणी झाल्याचे सुभाष देसाई यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितले. ही बोलणी खूप प्राथमिक स्वरुपाची होती. तपशीलवार चर्चा आता दिवाळीनंतर होईल. दोन-तीन दिवस जातील आणि सोमवारपासून चर्चा सुरू होईल. आम्ही भाजपला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. आता फक्त एकत्र येण्याचं ठरलं आहे. त्यानुसार तपशीलवार चर्चा, कोणता प्रस्ताव, कोणती खाती हे सर्व सोमवारनंतर चर्चा सुरू होईल. दिवाळीसाठी फार कोणी उपलब्ध नाही. सुट्टी असल्यामुळे दिवाळीनंतर या चर्चा सुरू होईल, असे देसाई यांनी सांगितले. 

काल रात्री प्राथमिक चर्चा झाली. दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना भाजपतर्फे नियुक्त करण्यात आले होते. यावेळी धर्मेद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील हे दोघे होते आणि शिवसेनेतर्फे अनिल देसाई आणि मी असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. या बैठकीची माहिती उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे. 

दरम्यान, भाजपला पूर्ण बहूमत मिळालेले नाही. शिवसेना, भाजपने सरकार बनवलं तर बरं, असं आमचंही मत आहे. पण सरकार बनविताना अटी खूप असल्या, तर सरकार चालवणं अवघड असतं. आधी मनाने एकत्र येऊ आणि मग बाकीच्या गोष्टी करता येतील, असे आमचं मत असल्याचे भाजपचे विनोद तावडे यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कसलीही स्पर्धा सुरू नाही, असा दावा भाजप नेते विनोद तावडे यांनी आज पुन्हा एकदा केलाय...

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.